A New Beginning – Pooja Nemade
‘Go Forth’ – played the new levi’s commercial on d flat screen. ‘I am’, thought Anita.
She was catching up on all her favourite soaps after 2 weeks. But she knew they hadn’t changed the tiniest bit unlike her life. Last 2 weeks…she mused as she pressed the coffee mug to her lips. Each day had been the same. She had worked all day long and come back home itching for some well-earned sleep. But it eluded her. She felt like an insomniac. She had no clue if she had even spared some time to eat. She checked the sink to find some unwashed dishes stacked in it and got back to the couch again. She muted the television not interested in the commercials. All was calm around. She could faintly hear the rhythm of classical music echoing in the neighbouring house. The storm of utterly mixed feelings raging inside her in contrast with the peaceful calm outside disturbed her. She switched on the audio again and increased the volume. She wondered if she was doing the right thing but before she could ruminate further on it, the title track of a soap ushered her into a dizzying nostalgia. She almost heard her 5 year old son and her husband’s stifled laughs behind her crackling their own private jokes and the usual yell, “Mom, I‘m hungry. Please give me something to eat,” right at the start of an episode. She was on the verge of getting up when she smiled to herself and settled back down on her couch knowing fairly well that today she could watch the entire episode from start till the end without having her son around aching to pester her and make her get up from the couch somehow but that did not make her feel good. It irked her rather. The unfairness of it all irked her. Her hand reached out to grab something lying on the table next to her. She closed her eyes. She had always been a pantheist but now she felt betrayed. She did not believe in Him anymore because her mind reasoned that if He did exist, He would never let that wretched drunk truck driver smash into their car 2 weeks back. She thought of her son and her husband smiling, laughing lost in their own world just before the truck hit their car and felt bile rise up in her throat. She swallowed it down. The immense unfathomable pain of the shock of their deaths had eased a bit now. But the emptiness she felt had not ebbed away even a bit. Her hand tightened around the gun she held. And then suddenly her eyes shot open. She couldn’t do this. It was almost as if she realized the implications of a call she got an hour back, as if she now understood the words she heard an hour back. She couldn’t end TWO lives. Though the emptiness she felt was suffocating, someone needed her to live. Now there was a hope living inside her. Anita got up from her couch. She knew this was a new beginning.
-Pooja Nemade
खेळ रंगला…! – Madura Potdar
लहान असताना पतंग खेळायचो….
उंच उडणारा पतंग,त्याचा काचणारा मांजा,पतंगाला लांबलचक शेपटी!!
कोणाचा साधा,कोणाचा झब्बू,कोणाचा जोकर…किती ते प्रकार,रंगेबेरंगी,विविधढंगी…!
लहानपणीचा साधा खेळ तो…!
वय वाढलं,जाणतेपणा आला,डोळे उघडून जग पाहिलं…वाटलं कि यात नवीन ते काय…पतंगाच्या खेळासारखा आयुष्याचा खेळ…!
फक्त पतंगाची जागा घेतली माणसांनी…स्वतःच्या कार्याभागासाठी त्यांना उडवतात ती देखील माणसचं….
चक्री धरायला सुद्धा नको का कोणी…ती सुद्धा माणसचं!!
उडवणाऱ्यानी फक्त मजा घ्यायची खेळाची.कधी वर चढवून आनंद लुटायचा,तर कधी संथ वाऱ्यावर सोडून देऊन फक्त दोर हातात ठेवायचा,झुलवत राहायचं सतत त्याला…
असंच चालू ठेवायचं,जोपर्यंत कोणी दुसरा रिंगणात येत नाही तोपर्यंत! आलेला जर झब्बू निघालाच,डोईजड ठरतोय वाटलं,तर सरळ काटाकाटी….
यातही उडवणाऱ्याना आनंदच मिळतो…दोराच तुमचा लेचापेचा,उडवणाऱ्या लोकांची काय चूक..?
काही कापले जाणार…काही इतरांना कापून दिमाखात मिरवत राहणार…कापलेले कुठं गेले,कोणाला खबर त्याची…
चुकून कटलाच उडवणाऱ्याचा एखादा वगैरे,तरी एकाला दुसरा कायमच हजर…किंवा सरळ विकत घ्यायचा…
चक्री हातात धरून उभा राहणाऱ्याकडे कोणाचे लक्ष…हात काचाला तरी तो सांगणार नाही…कारण आता खेळ रंगत आलाय…काटाकाटीचा सामना तर अटीतटीचा चाललाय….आणि उडवणाऱ्याचा आनंद तर आकाशात सुद्धा मावत नाहीये…!
-मदुरा
“रानफूल”- onkar Ekbote
” तू बुद्धी दे तू प्रकाश दे नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे “
शाळेतली प्रार्थना चालू होती. आज १४ जून. शाळेचा पहिला दिवस. सारी शाळा आज उत्साहाचे संमेलन भरल्यासारखी वाटत होती.प्रार्थनेनंतर मुले वर्गात गेली. अजून सर यायचे होते. मुलांचा गोंधळ सुरु होता.जुने मित्र पुन्हा भेटल्याच्या आनंदात, नव्या पुस्तकांचा आस्वाद घेण्यात मुले दंग होती.इतक्यात एक मुलगा वर्गात आला. पांढरा शर्ट,खादी pant आणि डोक्यावर गांधीटोपी असा त्याचा साधा वेष. त्याला पाहून वर्गातली टाय घातलेली, इस्त्रीचे कपडे घातलेली मुले हसू लागली. तो एका बाकाजवळ जाऊन दफ्तर ठेवणार इतक्यात किशोर कडाडला,”ए,ती माझी जागा आहे. तू माझ्याशेजारी बसायचं नाही. गावांढल ध्यान कुठलं!” हे ऐकताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. सर वर्गात आले. मुले उभी राहिली. ‘एक साथ नमस्ते’चा घोष झाल्यावर सरांनी सर्वांना बसायला सांगितले. ‘तो’सरांना म्हणाला,”मास्तर,मी कुटं बसू? मला हितं कुणी बसू द्येत न्हाईत” सरांच्या सारा प्रकार लक्षत आला. त्यांनी पहिल्या बाकावरच्या साहिलला त्याला जागा देण्यास सांगितले. “नाव काय तुझं?”सरांनी विचारले. “भैरव , भैरव मास्तर ” तो चाचरत बोलला. पुन्हा सगळा वर्ग हसू लागला. सरांनी सर्वांना शांत केले. सर म्हणाले,”छान नाव आहे तुझं. आणि आता इथे मास्तरांना ‘सर’ म्हणायचं. शहरातल्या नव्या पद्धती हळूहळू शिकून घे.”आणि सरांनी वर्गाची सुरुवात केली. किशोर आणि मयंक वर्गाचे ‘दादा’लोक होते. त्यातून scholarship मिळालेले दोघे हुशार. त्यामुळे वर्गात त्यांचा दबदबा असायचाच. दोघेही भैरववर हसत होते. कागदाचे बोळे करून त्याला मारत होते. भैरवला सारे समजत होते पण तो काही करू शकत नव्हता.
भैरवला त्याचे घर आठवले. घर कुठले, झोपडीच ती! वडील शेतमजूर म्हणून राबायचे; तर आई मोलकरीण म्हणून. त्याच्यानंतर दोन बहिणी घरात. दोन वेळच्या जेवणाची मारामार. तरीसुद्धा मुलाला शिकवण्यासाठी वाटेल तो त्रास सहन करणारे भैरवचे वडील आणि शिक्षणासाठी लागणाऱ्या पैशांसाठी स्वत:च्या सोन्याच्या बांगड्या गहाण ठेवणारी भैरवची आई आदर्शच होते.
भैरव हळूहळू शाळेत रुळत होता. पण सेमी-इंग्लिशच्या भोवऱ्यात अडकत होता. गणित आणि शास्त्र हे विषय इंग्रज्रीत असल्याने त्याची म्हणावी तशी प्रगती होत नव्हती. यथावकाश सहामाही परीक्षेचा निकाल जाहीर झाला. किशोर आणि मयंकला वर्गात सर्वात जास्त गुण होते.आणि भैरवला अपेक्षेप्रमाणे गणित आणि शास्त्रात कमी गुण होते.शाळा सुटल्यावर किशोर आणि मयंकने भैरवला चिडवायला सुरुवात केली,” बागेत लावलं तरी रानफूल हे रानफूलच राहणार. त्याचा गुलाब कधीच होणार नाही. गुलाबाचा रंग, गंध याची जराही सर रानफुलाला येणार नाही.” भैरवला हे बोल चांगलेच लागले. एकतर कमी गुण मिळाल्याने तो आधीच दु:खी होता, त्यात किशोर व मयंकचे हे कडवट बोल ऐकून तो रडायलाच लागला. दोघे मात्र हसत निघून गेले.
काही दिवसांनी शाळेची सहल निघाली. भैरव अजूनही एकटाच होता. त्याला कोणीही आपल्यात सामावून घेत नव्हते. बस मध्येही तो एकटाच होता. त्याला राहून राहून घरच्यांची आठवण येत होती. सारे विद्यार्थी व शिक्षक कासारागावात पोहोचले. दिवसभर रानात भटकून, सौंदर्याचा आस्वाद घेऊन सारे परतले. जेवण झाल्यावर सारे शेकोटीजवळ बसले. किशोर व मयंक शेकोतीतली लाकडे घेऊन फिरत निघाले. भैरवचेतर त्यांनी ‘रानफूल’ नामकरणच केले होते. भैरव एकटाच बसला होता. किशोर व मयंक तिथल्याच एका पडक्या वाड्यात गेले. सुरक्षितता म्हणून त्यांनी हातात जळकी लाकडे घेतली होतीच. वाड्यात एका खोलीत जुने कपडे, रद्दी वगैरे सामान दिसले. अंधारात फिरताना दोघांना खूपच धाडसी असल्यासारखं वाटत होतं.
पण इतक्यात चुकून मयंकच्या हातातलं जळतं लाकूड त्या कपड्यांवर पडलं. आणि कपड्यांनी ,राद्दीने पेट घेतला. बघता बघता वाड्याच्या त्या भागाला आगीने वेढले. किशोर व मयंक “वाचवा,वाचवा” असे ओरडू लागले. तो आरडाओरडा ऐकून सारी मुले धावत आली. शिक्षकांना काहीच माहीत नव्हते. ती प्रचंड आग पाहून मुले गर्भगळीत झाली. पुढे जायची कोणाचीच हिम्मत होत नव्हती. पण न घाबरता भैरव पुढे आला आणि आत शिरला. मयंकचा हात ओढून त्याला भैरवने वाड्याबाहेर ढकलून दिले. किशोर पर्यंत जाण्यासाठी मात्र भैरवला मार्ग मिळत नव्हता. अखेर कसेबसे त्याने किशोरला वाड्याबाहेर खेचले. किशोर बेशुद्ध झाला होता.
यथावकाश किशोर शुद्धीवर आला. भैरवने किशोर व मयंकचा जीव वाचवला होता. आता दोघेही पश्चात्तापाने पोळले होते. ते दोघे काही बोलणार इतक्यात भैरवच बोलला ,”अरं रानफुल हाय नव्हं मी . रानफुलाला वादळाची सवय असतीयाच. हा पन बागेतल्या गुलाबाला मातुर जोराच्या वाऱ्याची बी आदत नसतीया. रानफूल वाऱ्याफुड झुकतया म्हणून वारा बी त्याची पर्वा करतोय. पन गुलाबाचा ताठरपनाच त्याच्या इनाशाला कारन होतोय.” किशोर व मयंकने भैरवची माफी मागितली. अखेर वाऱ्याच्या लयीबरोबर रानफूल डौलत होतं.
यथावकाश भैरवला या साहसाबद्दल बक्षीस मिळालं. सरकार तर्फे त्याच्या शिक्षणाची सोय झाली. किशोर व मयंक त्याचे चांगले मित्र झाले. त्यांच्या मदतीने भैरवने अभ्यासातही प्रगती केली. गुलाबाच्या सहवासाने रानफूल मोहरले होते. गुलाबाचे काटे आता टोचत नव्हते. कारण रानफुलालाही त्याचे अस्तित्व मिळाले होते.
Onkar Ekbote
गांधी
गांधी
हे गाव अगदीच अजब बर का… इथे आटपाट वगैरे काही नाही. इथे फक्त
सरळ-सरळ वाटा. चालत जाव आणि चालतच राहावं.. कायम.
मार्गात दगड-धोंडे बरेच लागतात पण मार्गाचा साधेपणा सार जिंकून
नेतो.या गावच पाणी प्यायल्याविना सत्ता येणे दुरापास्त… गावातल्या
जीर्ण वस्त्रांच आणि झिजलेल्या वाहणाचं दर्शन घेतल्याविना
सिंहासनाच स्वप्नसुद्धा बघण अशक्य ! या गावात ना सोन्याची, ना
तेलाची खाण , ना व्यापारी पेठाना श्रीमंत बागायती .. गावासारखे गाव
तरी अजब ..
या गावचे गावकरी मातीतले आणि मातीशीच त्याच नात, आयुष्याच
आयुष्याशी ..(ह्या काळ्या मातीला मन साऱ्या जगात..)
या मातीच्या मोतीरूपी आविष्काराने अनेक माणसं आकर्षित झाली
काही त्या मातीच्या गंधाने तर काही त्या मातीच्या चकचकीत
दिसण्याने… पण मातीला कसला आलाय राग..! जसा आकार द्यावा
ती मूर्ती व्हायला माती सतत तयार.. आकार असो व नसो , मातीचं
अस्तित्व कायम राहत ! ह्या गावाची मातीच अजब !
ह्या मातीचा गंध घेऊन कोणी उठला आणि कस्तुरीला नाचवणारा आवेश
त्याने धारण केला .. त्याने जग बघण्याची निरालीच तऱ्हा विकसित
केली. त्याचा चष्मा गावासारखाच अजब निघाला.
त्याची नजर पुढल्या माणसाच्या चुका आणि उणीव कमी करून बघायची
तर सामर्थ्य, यश दुप्पट करून इथे सत्याशी बेईमानी नव्हती तर
सत्याचाच ध्यास होता.. सत्याचा हा अभिनव प्रयोग बघायला सिद्ध
होता हा चष्मा… या चष्म्यानी जगात कधी वेगळी माणसे बघितलीच
नाही.. आपल्याच मातीतला गंध तो शोधात राहिला.. ह्या चष्म्याला
चिवट नजर होती आणि भक्कम दृष्टी..
हा चष्मा होता तरी केवढा.. काळ्याकुट्ट चेहऱ्यावर ऐटीत बसायचा
पण समोर दिसणारा डाग चटकन पकडायचा आणि एक शस्त्र
उचलायचा.. ह्या शस्त्राकडे अक्षरांच सैन्य होत आणि शब्दांची
घोडदौड .. सापडलेला डाग मग मानाने स्वच्छ व्हायचा, जणू ‘शस्त्राने
पुनीत झालो..’
ह्या शास्त्राने आपल्याला कायमचे द्यावे. स्मृतीगंधाच्या लेण्यांमध्ये
शाश्वत तृप्तता द्यावी .. अमरत्वाची ही आशा सारी सारे बिनडाग
आणि डागवाले करायला लागले ही ह्या अजब गावच्या अजब शस्त्राची
कहाणी …
या गावातली माती, हा चष्मा हे शास्त्र सार अजब . लोकांना
या साऱ्यांची हौस किती.. ‘सद्भावने’साठी याच मातीचा पुकार,
आपल्या मनातील इच्छांना साकारण्याच्या अनेक ‘रामलीला’ याच
मातीने ‘आकारल्या’. याच मातीची मोहोर ‘चलन’ देते .. व्यवहाराला,
आचारासाठी अन् भ्रष्टाचारासाठी, या मातीचा गंध परदेशातसुद्धा !
या गावाचीच ही ख्याती ..
पण या मातीत या गावात अचानक धावपळ सुरु झाली .. कोणास ठाऊक
पण कुणाच तरी या चष्म्यावर फारच प्रेम असल्याच निदर्शनास
आलं.. कुणा दुसऱ्याने त्या ‘शस्त्रां’वर आपल ‘प्रेम’ व्यक्त केल..आज
या मातीचा तो चष्मा ते शस्त्र हरवतंय .. या गावातून आणि
माणसांमधूनसुद्धा कुणी हे ‘प्रेम’ व्यक्त केलं,
ह्याचा शोध घेण्यापेक्षा , माणसांमधून हरवलेल्यांचा शोध अधिक
महत्वाचा नाही का ?
( महात्मा गांधीजींचा चष्मा काही काळापूर्वी चोरीला गेला,
त्याविषयी एक समास, एक वात्रटिका)
-विनीत भट्ट
Bang your Shoe!

iOS 5 – What’s in Apple’s mind?
->
Pic of the Week
Sometimes, all you need is a watchful eye to capture the perfect moment. Abhishek Bhavsar from TY Computer clicked this picture of the mechanical chimney on a slightly overcast day. The picture rightfully captures the chimney towering above the “Boat-club” side of the campus in all its grandeur.
Anyone who has managed to capture an amazing shot , please share it with us…email it to us at coepmagazine@gmail.com and we will put it up as the “pic of the week”
Cheers
Team Abhiyanta Online.


Recent Comments