खेळ रंगला…! – Madura Potdar
लहान असताना पतंग खेळायचो….
उंच उडणारा पतंग,त्याचा काचणारा मांजा,पतंगाला लांबलचक शेपटी!!
कोणाचा साधा,कोणाचा झब्बू,कोणाचा जोकर…किती ते प्रकार,रंगेबेरंगी,विविधढंगी…!
लहानपणीचा साधा खेळ तो…!
वय वाढलं,जाणतेपणा आला,डोळे उघडून जग पाहिलं…वाटलं कि यात नवीन ते काय…पतंगाच्या खेळासारखा आयुष्याचा खेळ…!
फक्त पतंगाची जागा घेतली माणसांनी…स्वतःच्या कार्याभागासाठी त्यांना उडवतात ती देखील माणसचं….
चक्री धरायला सुद्धा नको का कोणी…ती सुद्धा माणसचं!!
उडवणाऱ्यानी फक्त मजा घ्यायची खेळाची.कधी वर चढवून आनंद लुटायचा,तर कधी संथ वाऱ्यावर सोडून देऊन फक्त दोर हातात ठेवायचा,झुलवत राहायचं सतत त्याला…
असंच चालू ठेवायचं,जोपर्यंत कोणी दुसरा रिंगणात येत नाही तोपर्यंत! आलेला जर झब्बू निघालाच,डोईजड ठरतोय वाटलं,तर सरळ काटाकाटी….
यातही उडवणाऱ्याना आनंदच मिळतो…दोराच तुमचा लेचापेचा,उडवणाऱ्या लोकांची काय चूक..?
काही कापले जाणार…काही इतरांना कापून दिमाखात मिरवत राहणार…कापलेले कुठं गेले,कोणाला खबर त्याची…
चुकून कटलाच उडवणाऱ्याचा एखादा वगैरे,तरी एकाला दुसरा कायमच हजर…किंवा सरळ विकत घ्यायचा…
चक्री हातात धरून उभा राहणाऱ्याकडे कोणाचे लक्ष…हात काचाला तरी तो सांगणार नाही…कारण आता खेळ रंगत आलाय…काटाकाटीचा सामना तर अटीतटीचा चाललाय….आणि उडवणाऱ्याचा आनंद तर आकाशात सुद्धा मावत नाहीये…!
-मदुरा

avadla…
anant baki kahi nahi wachlas ka?
ho vinit che vachale. pan te like ch karata yet nahi. Log in karave lagate. pan account creat hot nahiye.
Mast kavita ahe agadi “hridaysparshi”
Kup Chan…..!!!