Home > Uncategorized > गांधी

गांधी

गांधी

हे गाव अगदीच अजब बर का… इथे आटपाट वगैरे काही नाही. इथे फक्त

सरळ-सरळ वाटा. चालत जाव आणि चालतच राहावं.. कायम.

मार्गात दगड-धोंडे बरेच लागतात पण मार्गाचा साधेपणा सार जिंकून

नेतो.या गावच पाणी प्यायल्याविना सत्ता येणे दुरापास्त… गावातल्या

जीर्ण वस्त्रांच आणि झिजलेल्या वाहणाचं दर्शन घेतल्याविना

सिंहासनाच स्वप्नसुद्धा बघण अशक्य ! या गावात ना सोन्याची, ना

तेलाची खाण , ना व्यापारी पेठाना श्रीमंत बागायती .. गावासारखे गाव

तरी अजब ..

या गावचे गावकरी मातीतले आणि मातीशीच त्याच नात, आयुष्याच

आयुष्याशी ..(ह्या काळ्या मातीला मन साऱ्या जगात..)

या मातीच्या मोतीरूपी आविष्काराने अनेक माणसं आकर्षित झाली

काही त्या मातीच्या गंधाने तर काही त्या मातीच्या चकचकीत

दिसण्याने… पण मातीला कसला आलाय राग..! जसा आकार द्यावा

ती मूर्ती व्हायला माती सतत तयार.. आकार असो व नसो , मातीचं

अस्तित्व कायम राहत ! ह्या गावाची मातीच अजब !

ह्या मातीचा गंध घेऊन कोणी उठला आणि कस्तुरीला नाचवणारा आवेश

त्याने धारण केला .. त्याने जग बघण्याची निरालीच तऱ्हा विकसित

केली. त्याचा चष्मा गावासारखाच अजब निघाला.

त्याची नजर पुढल्या माणसाच्या चुका आणि उणीव कमी करून बघायची

तर सामर्थ्य, यश दुप्पट करून इथे सत्याशी बेईमानी नव्हती तर

सत्याचाच ध्यास होता.. सत्याचा हा अभिनव प्रयोग बघायला सिद्ध

होता हा चष्मा… या चष्म्यानी जगात कधी वेगळी माणसे बघितलीच

नाही.. आपल्याच मातीतला गंध तो शोधात राहिला.. ह्या चष्म्याला

चिवट नजर होती आणि भक्कम दृष्टी..

हा चष्मा होता तरी केवढा.. काळ्याकुट्ट चेहऱ्यावर ऐटीत बसायचा

पण समोर दिसणारा डाग चटकन पकडायचा आणि एक शस्त्र

उचलायचा.. ह्या शस्त्राकडे अक्षरांच सैन्य होत आणि शब्दांची

घोडदौड .. सापडलेला डाग मग मानाने स्वच्छ व्हायचा, जणू ‘शस्त्राने

पुनीत झालो..’

ह्या शास्त्राने आपल्याला कायमचे द्यावे. स्मृतीगंधाच्या लेण्यांमध्ये

शाश्वत तृप्तता द्यावी .. अमरत्वाची ही आशा सारी सारे बिनडाग

आणि डागवाले करायला लागले ही ह्या अजब गावच्या अजब शस्त्राची

कहाणी …

या गावातली माती, हा चष्मा हे शास्त्र सार अजब . लोकांना

या साऱ्यांची हौस किती.. ‘सद्भावने’साठी याच मातीचा पुकार,

आपल्या मनातील इच्छांना साकारण्याच्या अनेक ‘रामलीला’ याच

मातीने ‘आकारल्या’. याच मातीची मोहोर ‘चलन’ देते .. व्यवहाराला,

आचारासाठी अन् भ्रष्टाचारासाठी, या मातीचा गंध परदेशातसुद्धा !

या गावाचीच ही ख्याती ..

पण या मातीत या गावात अचानक धावपळ सुरु झाली .. कोणास ठाऊक

पण कुणाच तरी या चष्म्यावर फारच प्रेम असल्याच निदर्शनास

आलं.. कुणा दुसऱ्याने त्या ‘शस्त्रां’वर आपल ‘प्रेम’ व्यक्त केल..आज

या मातीचा तो चष्मा ते शस्त्र हरवतंय .. या गावातून आणि

माणसांमधूनसुद्धा कुणी हे ‘प्रेम’ व्यक्त केलं,

ह्याचा शोध घेण्यापेक्षा , माणसांमधून हरवलेल्यांचा शोध अधिक

महत्वाचा नाही का ?

( महात्मा गांधीजींचा चष्मा काही काळापूर्वी चोरीला गेला,

त्याविषयी एक समास, एक वात्रटिका)

-विनीत भट्ट

Advertisements
Categories: Uncategorized Tags:
  1. Madura
    November 12, 2011 at 10:39 pm

    🙂

  1. No trackbacks yet.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: